सुनयनाची आगेकूच
भारताची आघाडीची स्क्वॅशपटू जोश्ना चिन्नप्पाला महिला एकेरी स्क्वॅश इव्हेंटमध्ये कॅनडाच्य हॉली नॉटन हिच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. 18 वेळा नॅशनल चॅम्पियन राहिलेल्या जोश्नाला 27 वर्षीय नॉटनकडून 9-11, 5-11, 13-15 अशा फरकाने पराभव पत्करावा लागला.
वास्तविक, जोश्नाने 6-3 अशा फरकाने आघाडी घेत उत्तम सुरुवात केली होती. पण, नंतर नॉटनने प्रारंभी 6-6 अशी बरोबरी मिळवली आणि ती पुढे 9-9 पर्यंत कायम राखली. त्यानंतर तिने पहिला गेम 2 गुणांनी जिंकला. तिने हाच धडाका त्यानंतर पुढील सलग दोन गेममध्ये कायम राखला आणि जोश्नाचे आव्हान संपुष्टात आणले. अन्य एका लढतीत भारताच्या सुनयना साना कुरुविल्लाने लंकेच्या सिनालीचा पराभव केला. कोचीच्या 23 वर्षीय सुनयनाने अवघ्या 12 मिनिटात 11-3, 11-2, 11-2 असा एकतर्फी विजय मिळवला.









