बेळगाव : केरळा येथील तिरुवनंतपुरम येथे खेलो इंडिया राष्ट्रीय महिला मालिका 2 च्या वतीने आयोजित जलतरण स्पर्धेत स्विमर्स व अॅक्वेरेस जलतरण बेळगावची जलतरणपटू इमानी जाधव हिने 3 सुवर्ण, 2 रौप्यपदक मिळवित यश संपादन केले आहे.
केरळा येथे झालेल्या या जलतरण स्पर्धेत बेळगावची जलतरणपटू इमानी जाधव हिने 100 मी. बॅकस्ट्रोक, 200 मी. बॅकस्ट्रोक, बॅकस्ट्रोक किक अँड डेव्हलपमेंट इव्हेंट या तिन्ही स्पर्धेत 3 सुवर्णपदके तर 200 मी. वैयक्तिक मिडले व 200 मी. स्पर्धेत रौप्यपदक पटकाविले. इमानी जाधव हि जेएनएमसीच्या जलतरण तलावात सरावर करीत असून तिला प्रशिक्षक अक्षय शेरेगार, अजिंक्य मेंडके, नितीश कुडूचकर व गोवर्धन काकतीकर यांचे बहुमूल्य मार्गदर्शन तर उमेश कलगटगी, सुधीर कुसाणे व प्रसाद तेंडुलकर यांचे प्रोत्साहन लाभत आहे.









