बेळगाव : विजेचा दाब कमी-जास्त झाल्याने शिवाजीनगरमधील एका घरातील फ्रिज शॉर्टसर्किटने पूर्णपणे जळून खाक झाला आणि अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात एकच घबराट उडाली. केवळ सुदैव म्हणून फ्रिजनजीकच असलेल्या सिलिंडरला कोणताही धक्का लागला नाही. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. शिवाजीनगर पहिली गल्ली, दुसरा क्रॉस येथील प्रिया आंबेवाडीकर यांच्या घरात ही दुर्घटना घडली. शिवाजीनगरमध्ये सातत्याने विजेचा दाब कमी-जास्त होण्याचे प्रकार घडत आहेत. याबाबत नागरिकांनी हेस्कॉमकडे तक्रारही केली आहे. परंतु, त्याकडे हेस्कॉमने दुर्लक्ष केले आहे. प्रिया आंबेवाडीकर या कामासाठी बाहेर गेल्या होत्या. मात्र, अचानक घरातून आग लागून धूर येत असल्याचे पाहताच नागरिकांनी दरवाजा उघडून पाहता संपूर्ण फ्रिज शॉर्टसर्किटने जळाल्याचे दिसले. या दुर्घटनेमुळे प्रिया आंबेवाडीकर यांचे जवळजवळ दीड लाखाचे नुकसान झाले आहे. अलीकडच्या काळात शॉर्टसर्किटमुळे आग लागण्याचे प्रकार वाढत आहेत. भरवस्तीत असा प्रकार घडल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.
Previous Articleबेळगाव-दिल्ली विमानफेरी सुरू
Next Article सफाई कंत्राटदारांच्या निवेदनाने खळबळ
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









