बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत येणाऱ्या मिलिटरी हॉस्पिटल ते पाईपलाईन दरम्यानच्या रामघाट रोडवरील ब्लॅक स्पॉट कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून हटविण्यात आला आहे. ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणी लाल माती टाकण्यात आल्याने गलिच्छ बनलेल्या परिसराने मोकळा श्वास घेतला आहे. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. महापालिकेकडून शहरातील ब्लॅक स्पॉट हटविले जात आहेत. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. त्याचबरोबर आता कॅन्टोन्मेंटनेदेखील आपला परिसर ब्लॅक स्पॉट मुक्त करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे. मिलिटरी हॉस्पिटल ते पाईप लाईनकडे जाणाऱ्या रस्त्याकडेला मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात आला होता. त्यामुळे परिसरात दुर्गंधीसह गलिच्छ वातावरण निर्माण झाले होते. कचरा हटविण्यासह परिसर स्वच्छ करावा, अशी मागणी केली जात होती. त्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून त्या ठिकाणचा कचरा हटवून त्यावर लाल माती टाकण्यात आली आहे.
Previous Article15 ऑगस्टपर्यंत आरक्षण जाहीर करा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









