नवी दिल्ली
: पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवार, 8 एप्रिल रोजी तेलंगणा दौऱ्यावर जाणार आहेत. हैदराबादमध्ये ते वंदे भारत टेनला हिरवा झेंडा दाखवतील. चालू वर्षाच्या अखेरीस राज्यात विधानसभा निवडणुका होणार असल्याने पंतप्रधानांसह इतर केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ भाजप नेत्यांचे तेलंगणातील दौरे वाढलेले दिसून येत आहेत. पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या अवघ्या तीन दिवस आधी भाजप प्रदेशाध्यक्ष बंदी संजयकुमार यांच्या अटकेने तेलंगणातील राजकीय वातावरण तापले होते. आता त्यांची जामीनावर सुटका झाली आहे.









