शिवप्रतिष्ठानचे संस्थापक भिडे गुरुजी यांचे खानापूर येथील धारकऱयांना मार्गदर्शन
प्रतिनिधी /खानापूर
खानापूर तालुक्यात दुर्गामाता दौड आणि धारातीर्थयात्रा मोहिमेबाबत युवकांमध्ये जागृती करण्यासाठी येथील स्वामी समर्थ केंद्रात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. दि. 26 सप्टेंबरपासून सुरू होणाऱया दुर्गामाता दौडीच्या नियोजनासंदर्भात यावेळी भिडे गुरुजीनी मार्गदर्शन केले. जिल्हा प्रमुख किरण गावडे, विश्वनाथ पाटील, हिरामणी मुंचडीकर यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली.
तालुक्यात सर्व ग्रामीण भागात दुर्गामाता दौड सुरू करण्यात यावी, यासाठी रत्नाकर निलजकर हेब्बाळ, शुभम पाटील गर्लगुंजी, मंजुनाथ पाटील कुप्पटगिरी, करण पाटील, मनोहर गावडे, जितेंद्र पाटील, संतोष परमेकर, सागर पाटील, दीपक परमेकर, प्रथमेश मोगेरे या कार्यकर्त्यांवर दुर्गामाता दौड तालुक्यातील प्रत्येक गावात सुरू करण्याची जबाबदारी देण्यात आली. तसेच शिवचरित्र ग्रंथाच्या वितरणाची जबाबदारी दीपक वाळवे आणि मारुती पाटील यांच्यावर सोपविली.
सुवर्णसिंहासनासाठी 10 हजार कार्यकर्ते तयार करण्याची सूचना
रायगडावर उभारण्यात येणाऱया सुवर्णसिंहासनाच्या संरक्षणासाठी खडा पहारा उपक्रमासाठी तालुक्यातून दहा हजार कार्यकर्ते तयार करण्यात यावेत, अशी सूचना यावेळी भिडे गुरुजीनी केली. यावेळी स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख दीपक वाळवे यांनी गुरुजींचा केंद्राच्यावतीने शाल, श्रीफळ व स्वामींची प्रतिमा देवून सत्कार केला. ध्येयमंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.









