वृत्तसंस्था/ सेऊल
डब्ल्यूटीए टूरवरील येथे रविवारी झालेल्या कोरियन खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत अमेरिकेच्या टॉप सिडेड जेसिका पेगुलाने एकेरीचे अजिंक्यपद पटकाविताना यूआन यूई हिचा पराभव केला.
2007 नंतर या स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद मिळविणारी टॉप सिडेड पेगुला ही पहिली अमेरिकन टेनिसपटू आहे. 2007 साली अमेरिकेच्या व्हिनस विलियम्सने ही स्पर्धा जिंकली होती. रविवारी झालेल्या. महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात पेगुलाने यूईचा 6-2, 6-3 अशा सरळ सेट्समध्ये फडशा पाडला. पेगुलाच्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीतील हे चौथे विजेतेपद आहे.









