न्यूयॉर्क
: नोबेल पुरस्कार विजेत्या आणि अमेरिकेच्या सर्वात प्रसिद्ध कवयित्री लुइस ग्लुक यांचे वयाच्या 80 व्या वर्षी निधन झाले आहे. अमेरिकन प्रकाशन कंपनी फर्रार, स्ट्रॉस आणि गिरॉक्सचे संपादयक जोनाथन गॅलासी यांनी ग्लुक यांच्या निधनाची माहिती दिली आहे. लुइस ग्लुक यांना साहित्यातील योगदानासाठी अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.









