वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
शनिवारी येथे झालेल्या 28 व्या फिनेस्टा खुल्या राष्ट्रीय टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत मणिपूरचा शंकर हेसनाम आणि महाराष्ट्राची प्रिशा शिंदे यांनी अनुक्रमे पुरुष आणि महिला एकेरीतील अजिंक्यपदे पटकावली.
16 वर्षाखालील वयोगटाच्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात 16 व्या मानांकित शंकरने तामिळनाडूच्या सातव्या मानांकित व्ही. थिरुमुरगनचा 6-1, 6-2 असा पराभव केला तर महिलांच्या 14 वर्षाखालील वयोगटातील अंतिम सामन्यात प्रिशा शिंदेने सहाव्या मानांकित अनंदिता उपाध्येवर 6-1, 6-2 अशी मात केली. मुलींच्या 16 वर्षाखालील वयोगटातील एकेरीचे जेतेपद ऋषिता बसीरे•ाrने पटकावताना दिल्लीच्या बिस्तचा 6-4, 6-3 असा पराभव केला. मुलांच्या 14 वर्षाखालील वयोगटातील एकेरीचे जेतेपद तेलंगणाच्या टॉप सिडेड ऋतिक कटकमने पटकावताना कर्नाटकाच्या प्रकाश सरेनचा 6-4, 6-3 असा फडशा पाडला.









