ढाका
बांगलादेशची राजधानी ढाका येथील प्रसिद्ध बंगाबाजारमध्ये मंगळवारी सकाळी भीषण आग लागली आहे. या आगीमुळे 2900 दुकानांचे नुकसान झाले आहे. या आगीमुळे 8 जण जखमी झाले आहेत. आग विझविण्यासाठी सैन्य, नौदल अन् वायुदलाचीही मदत घेण्यात येत आहे. आगीची तीव्रता वाढल्याचे पाहून व्यापाऱयांनी दुकानातील सामग्री बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला होता. तरीही बहुतांश दुकाने ही कपडय़ांची असल्याने आग वेगाने फैलावली. आगीमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
……………………………………………………………………………………………………..









