वृत्तसंस्था/ बेंगळूर
2023 च्या टाटा आयपीएल चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत येथे बुधवारी यजमान रॉयल चॅलेजर्स बेंगळूर आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्याला चिन्नास्वामी स्टेडियमवर सायंकाळी 7.30 वाजता प्रारंभ होणार आहे. यजमान बेंगळूरचा संघ या सामन्यात आणखी एक विजय मिळवून आपली स्थिती अधिक भक्कम करण्याचा प्रयत्न करीत आहे. तर कोलकाता नाईट रायडर्सचा संघ नशीबाची साथ आपल्याला मिळेल यासाठी आशावादी आहे.
कोलकाता नाईट रायडर्स संघाने यापूर्वी दोनवेळा आयपीएल स्पर्धा जिंकली होती. दरम्यान 2023 च्या आयपीएल हंगामात त्यांना गेल्या चार सामन्यात घरच्या मैदानावर तसेच बाहेरच्या ठिकाणीही पराभव पत्करावा लागला आहे. नितीश राणाच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्सने आतापर्यंत सात सामन्यात केवळ दोन विजय आणि पाच पराभव नोंदवत चार गुणासह गुणतक्त्यात सातवे स्थान मिळवले आहे. कोलकाता संघाला या चालू आयपीएल स्पर्धेत नियमित कर्णधार श्रेयस अय्यर आणि अष्टपैलू शकीब अल हसनला मुकावे लागल्याने त्यांची स्थिती अधिकच नाजूक झाली आहे. गेल्या रविवारच्या सामन्यात धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्जने कोलकाता संघाचा 49 धावा पराभव केला होता. कोलकाता संघाची फलंदाजी गेल्या अनेक सामन्यांमध्ये फारशी समाधानकारक झालेली नाही. बुधवारच्या सामन्यात कोलकाताचा संघ प्रामुख्याने वेंकटेश अय्यर, नितीश राणा आणि जगदीशन यांच्या कामगिरीवर राहिल. पण या तिन्ही खेळाडूवर चांगले दडपण जाणवत आहे. सुनील नरेन, आंद्रे रसेल यांच्याकडून मात्र फलंदाजीत अपेक्षाभंग होत आहे. लंकेचा लिटन दास, सुनील नरेन, गुरबाज यांच्या कामगिरीवरच कोलकाताचे यश अवलंबून राहिल. कोलकाता संघातील जगदीशन चेन्नईविरुद्धच्या सामन्यात आपले खाते उघडू शकला नव्हता. कोलकाता संघातील रिंकू सिंग याची फलंदाजीतील कामगिरी आतापर्यंत समाधानकारक झाली असून पुन्हा त्याच्याकडून आक्रमक खेळीची अपेक्षा बाळगली जात आहे. कोलकाता संघासमोर अष्टपैलू खेळाडूंच्या तंदुरुस्तीची समस्या अद्यापही जाणवत आहे.
डु प्लेसिस आणि कोहली यांच्या रॉयल चॅलेजर्स बेंगळूर संघाने या हंगामात चांगली कामगिरी केली असून त्यांनी अलीकडच्या शेवटच्या सामन्यात चिवट राजस्थान रॉयल्सवर 7 धावांनी विजय मिळवला असल्याने या संघाचा आत्मविश्वास अधिकच वाढला आहे. सलामीचा फलंदाज डु प्लेसिसने आपल्या फलंदाजीत सातत्य राखत सर्वाधिक धावा जमवल्या आहेत. तर त्याने आपल्या संघाच्या आतापर्यंतच्या सात सामन्यापैकी 4 सामन्यात दमदार फलंदाजी करत बेंगळूरला विजय मिळवून दिला आहे. डु प्लेसिसने कोहली आणि मॅक्सवेलसमवेत शतकी भागीदाऱ्या नोंदवल्या आहेत. मात्र बेंगळूर संघातील मधल्या फळीतील दिनेश कार्तिक, लोमरोर व शाहबाज अहमद यांची फलंदाजीतील कामगिरी चांगली झालेली नाही. बेंगळूर संघाची गोलंदाजी गेल्या काही सामन्यात अचूक आणि शिस्तबद्ध होत असून या संघातील वेगवान गोलंदाज मोहमद सिराजने पर्पल कॅपसाठी आघाडीचे स्थान मिळवले आहे. त्याने आयपीएल स्पर्धेत यावर्षी आतापर्यंत सात सामन्यात 89 डॉट बॉल टाकले आहेत. मोहमद सिराजला हसरंगा तसेच हर्षल पटेल यांची साथ मिळत आहे. बुधवारच्या सामन्यात कोलकाता संघातील फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती, सुयश शर्मा आणि सुनील नरेन यांच्यासमोर बेंगळूरच्या फलंदाजांना थोडी सावधगिरी बाळगावी लागेल.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर : फॅफ डु प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, मोहमद सिराज, हर्षल पटेल, दिनेश कार्तिक, शाहबाज अहमद, अनुज रावत, आकाशदीप, महिपाल लोमरोर, अॅलेन, सुयश प्रभुदेसाई, कर्ण शर्मा, सिद्धार्थ कौल, डेव्हिड विली, वेन पार्नेल, हसरंगा, मॅक्सवेल, हिमांशू शर्मा, मनोज भांडगे, राजन कुमार, अविनाश सिंग, सोनू यादव, विजयकुमार विशाख आणि मिचेल ब्रेसवेल.
कोलकाता नाईट रायडर्स : ा†नतीश राणा (कर्णधार), रहमानउला गुरबाज, वेंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शार्दुल ठाकूर, लॉकी फर्ग्युसन, उमेश यादव, ा†टम साऊदी, हर्षित राणा, वऊण चक्रवर्ती, अनुकुल रॉय, रिंकू सिंग, एन. जगदीशन, वैभव अरोरा, सुयश शर्मा, डेव्हिड ा†वसे, कुलवंत खेजरा†लया, ा†लटन दास, मनदीप सिंग, जेसन रॉय.
सामन्याची वेळ : 7.30 वाजता.









