बेळगाव : बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन आयोजित खुल्या जिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल स्केटिंग रिंक गणेशपूर, बेळगाव येथे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 100 पेक्षा अधिक स्केटिंगपटूंनी सहभागा घेतला होता. या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळा समारंभला अशोक गोरे, दंडपाणी, जक्की रे•ाr, मुकेश नौतिहाल, सूर्यकांत हिंडलगेकर, तुकाराम पाटील, स्केटर्स आणि पालक उपस्थित होते. निकाल पुढीलप्रमाणे, क्वाड स्केटिंग 5 ते 7 वर्षांची मुले : आदिश हल्यालने 1 सुवर्ण, अनमोल चौगले 1 रौप्य, श्लोक भोजण्णवर 1 कांस्य, रियांश पुरोहित 1 कांस्य. मुली वयोगट : प्रिशा मरीआई 1 सुवर्ण, श्रीशा मुरकुंबी 1 रौप्य. 7 ते 9 वर्षांची मुले : रचित नांगरे 1 सुवर्ण, जगदीश पडियन 1 रौप्य, सार्थक सामंत 1 कांस्य. मुली वयोगट : दुर्वा पाटील 1 सुवर्ण, स्वरा सामंत 1 रौप्य, देशना चपरबंदी 1 कांस्य. 9 ते 11 वर्षे मुले : श्रेयश बलोल 1 सुवर्ण, अदनान तालिकोटी 1 रौप्य. मुली वयोगट : सिद्धी पाटील 1 सुवर्ण, हर्ष कट्टीमणी 1 रौप्य, आराध्या हल्याल 1 कांस्य. 11 ते 14 वर्षे मुले : सौरभ साळोखे 1 सुवर्ण, सत्यम पाटील 1 रौप्य. मुली वयोगट : अनघा जोशी 1 सुवर्ण, खुशी आगसीमनी 1 रौप्य, प्रेरणा नटियाल 1 कांस्य. 14 ते 17 वयोगटातील मुली : सानवी इटगिकर 1 सुवर्ण, साक्षी साळुंखे 1 रौप्य, सई पाटील 1 कांस्य. 17 वर्षांवरील मुली : रितिका साखरे 1 सुवर्ण पदक पटकाविले. इनलाइन स्केटिंगचा निकाल – 5 ते 7 वयोगटातील मुली : कियारा जाधव 1 सुवर्ण. 7 ते 9 वर्षांची मुले : आदित्य सहकारी 1 सुवर्ण, अद्विक शेट्टी 1 रौप्य. मुली वयोगट : सांविका खोत 1 सुवर्ण. 9 ते 11 वर्षे मुले : आरशन माडीवाले 1 सुवर्ण, हिरेन राज 1 रौप्य, वंश चुडस्म्मा 1 कांस्य. 9 ते 11 वयोगटातील मुली : सुकन्या कुपानी 1 सुवर्ण. 11 ते 14 वर्षे मुले : पंकज कुपानी 1 सुवर्ण. मुली : अणू सहकारी 1 सुवर्ण पदक पटकाविले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेत्यांना पदके, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, विठ्ठल गगणे, विशाल वेसणे, तुकाराम पाटील, श्री रोकडे व इतरांनी वरील चॅम्पियनशिपच्या आयोजनासाठी मेहनत घेतली.
Previous Articleकोलकाताची आज लढत बेंगळूरशी
Next Article बेळगाव स्पोर्ट्स क्लब, लायाज क्रिकेट अकादमी विजयी
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









