वृत्तसंस्था /कोची
केरळमध्ये एका अल्पवयीन मुलीचे तिच्या घरातून अपहरण करत तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. मध्य केरळच्या अलुवा भागात गुरुवारी या मुलीचे अपहरण करण्यात आले होते. अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्यावर तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. लैंगिक शोषणानंतर अल्पवयीन मुलीला शेतात एकटे सोडून आरोपीने पळ काढला होता. या क्रूर घटनेत जखमी झालेल्या मुलीवर रुग्णालयात उपचार केले जात आहेत. पीडित मुलीने आरोपीची ओळख पटविली असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. प्रारंभिक माहितीनुसार संशयित आरोपी हा केरळचाच रहिवासी आहे. आम्हाला आरोपीचा सुगावा लागला असून आम्ही त्याचा शोध घेत आहोत. पीडितेला कलामस्सेरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे पोलीस अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.









