स्वामीजींच्या जीवन चरित्राचा चित्रफितीद्वारे आढावा : महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता

प्रतिनिधी /बेळगाव
प.पू. मौनतपस्वी श्री जडेयशांतलिंगेश्वर महास्वामी यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त गुरुवंदना व तुलाभार कार्यक्रम पार पडला. शिवबसवनगर येथील केपीटीसीएल समुदाय भवनमध्ये हा कार्यक्रम झाला. व्यासपीठावर प. पू. मौनतपस्वी जडेयशांतलिंगेश्वर महास्वामी, कारंजी मठाचे गुरुसिद्ध स्वामीजी, खासदार मंगला अंगडी, माजी मंत्री अल्लम वीरभद्रप्पा, शब्र संगमेश्वर शिवाचार्य स्वामीजी, श्री मनिप्र सदाशिव स्वामीजी, शब्र घनबसव अमरेश्वर शिवाचार्य स्वामीजी, वीरशैव महासभा जिल्हाध्यक्षा रत्नप्रभा बेल्लद, एस. आर. पाटील आदी उपस्थित होते.
प्रारंभी महिला मंडळाने प्रार्थना सादर केली. उपस्थित स्वामीजी आणि मान्यवरांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. शिवाय उपस्थितांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. मागील 43 वर्षांपासून मौन धारण केलेले जडेयशांतलिंगेश्वर महास्वामीजींच्या वाढदिवसानिमित्त तुलाभार करण्यात आला. यावेळी समाजातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
कर्नाटक, महाराष्ट्रासह विविध भागात मौनतपस्वी म्हणून ओळखल्या जाणाऱया श्री जडेयशांतलिंगेश्वर स्वामीजींच्या जीवन चरित्राचा चित्रफितीद्वारे आढावा घेण्यात आला. या चित्रफितीमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन, प्राणी हत्येसारख्या अनिष्ट प्रथांच्या विरोधाबाबत कशाप्रकारे जागृती केली हे दाखविण्यात आले. त्याबरोबर अनेक गावे व्यसनमुक्त झाली आहेत. हे चित्रफितीद्वारे दाखविण्यात आले. महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता झाली. याप्रसंगी भाविक, नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.









