वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
अलिकडेच हिरो पुरस्कृत इंटरकाँटीनंटल चषक फुटबॉल स्पर्धा जिंकणाऱ्या भारतीय पुरुष फुटबॉल संघाला ओडीशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी 1 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

या स्पर्धेमध्ये भारतीय संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने आपला 87 वा आंतरराष्ट्रीय गोल नोंदविला होता. या स्पर्धेत झालेल्या अंतिम सामन्यात भारताने लेबेनॉनचा 2-0 असा एकतर्फी पराभव करुन रविवारी रात्री येथील कलिंगा स्टेडियमवर विजेतेपद मिळविले होते. या सामन्यात भारताचा दुसरा गोल एल. चेंगटेने नोंदविला होता. या स्पर्धेत विजेतेपद मिळविल्याबद्दल ओडीशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी भारतीय फुटबॉल संघाचे खास अभिनंदन केले आहे. सदर स्पर्धा ओडीशा शासनाने यशस्वीपणे भरविल्याबद्दल अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष कल्याण चौबे यांनी मुख्यमंत्री पटनाईक यांचे आभार मानले आहेत.









