घरगुती साहित्य जळाल्याने 5 लाखाचे नुकसान
वार्ताहर/मजगाव
कलमेश्वरनगर मजगाव येथील रहिवासी सूरज मजुकर यांच्या राहत्या घरातील फ्रिजच्या शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागून त्यामध्ये घरगुती साहित्य जळून खाक झाल्याने सुमारे पाच लाखाचे नुकसान झाले आहे. आगीच्या ज्वाला आणि धूर जेव्हा घराबाहेर आला. तेव्हा घराबाहेर कपडे धुणाऱ्यांनी पाहिले. यावेळी घरी कोणीच नव्हते. त्यावेळी आरडा ओरडा करून नागरिकांना जमविण्यात आले. पण तोपर्यंत आगीने भडका घेतला होता. घराच्या बाहेर बोअरवेल आणि पाण्याची टाकी आहे. त्याच बोअरवेलचे पाणी घेवून तरुणांनी व महिलांनी आग विझविण्यास मदत केली. पाण्याच्या माऱ्यामुळे आग आटोक्यात आली. मात्र दोन खोल्यांमधील संसारपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. सदर घटनेचा उद्यमबाग पोलिसांनी पंचनामा केल्याचे समजते.









