प्रत्येक तालुक्मयात 106 कोंबडय़ा देणार : लाभार्थी बीपीएलधारक आवश्यक
प्रतिनिधी /बेळगाव
गावरान कोंबडय़ांचे संवर्धन व्हावे आणि ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक पाठबळ मिळावे, याकरिता पशुसंगोपन खात्यामार्फत गावरान कोंबडी वाटप योजना राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत प्रत्येक तालुक्मयात 106 कोंबडय़ा वाटप केल्या जाणार आहेत. मात्र लाभार्थी बीपीएल कुटुंबातील महिला असणे आवश्यक आहे. प्रत्येक तालुक्मयातील 20 लाभार्थ्यांची निवड करून 5 आठवडे वयाच्या कोंबडय़ा दिल्या जाणार आहेत.
ग्रामीण भागातील महिलांनी चांगल्या प्रतिच्या कोंबडय़ा पाळाव्यात, याकरिता ही योजना राबविण्यात आली आहे. अलीकडे बॉयलर, कडकनाथ आणि इतर कोंबडय़ांच्या जातींमुळे गावरान कोंबडय़ांकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे गावरान केंबडय़ांची संख्या झपाटय़ाने घटली आहे. दरम्यान गावरान कोंबडय़ांची संख्या वाढावी आणि संवर्धन व्हावे, याकरिता गावरान कोंबडय़ांचे वाटप केले जाणार आहे.
शेती व्यवसायाला आर्थिक पाठबळ मिळावे आणि कुक्कुटपालनाला प्रोत्साहन मिळावे, यासाठी खात्याने ही महत्त्वाकांक्षी योजना जारी केली आहे. गावरान कोंबडय़ांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती अधिक असल्याने त्यांना सहजासहजी कोणत्याही रोगाची लागण होत नाही. शिवाय कोंबडय़ांचा अंडी आणि मासासाठी देखील उपयोग केला जातो. तसेच गावरान कोंबडय़ांच्या अंडी आणि मासाला अधिक मागणी असल्याने या कोंबडय़ांचे वाटप केले जाणार आहे.
ग्रामीण भागातील महिलांसाठी उपयुक्त योजना
गावरान कोंबडय़ांच्या संवर्धनासाठी ही योजना राबविली गेली आहे. निवड समितीच्या आदेशानुसार लाभार्थ्यांची निवड करून कोंबडी वाटप केले जाणार आहे. ग्रामीण भागातील महिलांसाठी ही उपयुक्त योजना आहे.
– डॉ. राजीव कुलेर (उपनिर्देशक पशुसंगोपन खाते)









