वार्ताहर /सांबरा
सर्व राष्ट्रीय पक्षाकडून जाणून-बुजून मराठी भाषेची व मराठी संस्कृतीची अवहेलना करण्यात येत आहे. त्यासाठी त्यांना त्यांची जागा दाखवण्याची हीच वेळ आहे. बेळगाव ग्रामीणमधून आम्ही आर. एम. चौगुलेना मोठ्या मतफरकाने निवडून आणून एकसंध मराठा ही ताकद दाखवून देऊ, असे मत ग्रा. पं. सदस्य रमेश मोदगेकर यांनी व्यक्त केले. ते निलजी येथे शेतकरी संघटनेच्या जागृती सभेत बोलत होते. अध्यक्षस्थानी गोपाळ पाटील होते. निलजी गाव हे समितीचे एकनिष्ठ गाव असून शंभर टक्के मतदान समितीला करण्याची या गावची परंपरा आहे. ही परंपरा यावेळीही आपण जोपासू, असा विश्वास येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. या बैठकीला शेतकरी संघटनेचे प्रकाश पाटील, गुंडू भरमा पाटील, रवळू मोदगेकर, कृष्णा अष्टेकर, भावकाण्णा मोदगेकर, सिद्धराय गोपाळ पाटील, शामराव पाटील, मधु मोदगेकर, कृष्णा भावकाण्णा पाटील, पिराजी अक्षीमणी, मारुती पाटील, नागेंद्र यल्लाप्पा पाटील, सहदेव मोदगेकर, संजय अर्जुन मुकुंद, वामन मुकुंद, कल्लाप्पा निंगाप्पा मलानी, शंकर मेनसे, आप्पाणगौडा पाटील, नारायण गोमानाचे, सचिन पाटील, सुनील पाटील, तुकाराम मुकुंद आदी कार्यकर्ते हजर होते.









