बेळगाव ; मराठा बँकेच्यावतीने पांडुरंग जाधव यांचा सेवानिवृत्तीनिमित्त बँकेचे चेअरमन दिगंबर पवार यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. प्रारंभी माजी चेअरमन बाळासाहेब काकतकर यांनी प्रास्ताविक केले. ते आपल्या भाषणात म्हणाले की, पांडुरंग जाधव हे मराठा बँकेचे बेळगावातील नामवंत पिग्मी कलेक्टर आहेत. त्यांनी आपल्या प्रामाणिक व विश्वासाच्या जोरावर चांगले नाव कमावले. आपल्या क्रियाशील कार्याने व मनमिळावू स्वभावाने ते सर्वांच्या आदरास पात्र आहेत. सुशीलकुमार खोकाटे म्हणाले की, पी. के. जाधव यांचे बँकेच्या सर्व संचालकांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. ते आमच्या बँकेचे ब्रँड-अॅम्बेसेडर आहेत. चेअरमन दिगंबर पवार म्हणाले की, पांडुरंग जाधव हे पिग्मी क्षेत्रातील आदर्श आहेत. त्यांची नम्रता, सचोटी व प्रामाणिकपणा आणि कार्य करण्याची पद्धत कौतुकास्पद आहे. बँकेच्या प्रगतीमध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे. याप्रसंगी लक्ष्मणराव होनगेकर, बी. एस. पाटील, सुनील अष्टेकर, शेखर हंडे, रेणू किल्लेकर, नारायण किटवाडकर यांची भाषणे झाली. यावेळी संचालक मोहन चौगुले, विनोद हंगीरगेकर, लक्ष्मण नाईक, बेकर्स सोसायटीचे चेअरमन शिवाजीराव हंगीरगेकर, मारुतीराव देवगेकर, अॅड. सुहास किल्लेकर, महेश कुगजी व जाधव परिवार उपस्थित होता. सूत्रसंचालन जनरल मॅनेजर संतोष धामणेकर यांनी केले. व्हा. चेअरमन नीना काकतकर यांनी आभार मानले.
Previous Articleमंडोळी येथील नवदांपत्याकडून 32 मन सुवर्ण सिंहासनाला देणगी
Next Article निलजी येथे शेतकरी संघटनेची जागृती सभा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









