बेळगाव : आनंद कोचिंग क्रिकेट अकादमी आयोजित आनंद चषक 16 वर्षाखालील आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात बेळगाव स्पोर्ट्स क्लब संघाने निना क्रिकेट अकादमीचा 67 तर लायाज क्रिकेट अकादमीने एसकेई क्रिकेट अकादमी संघाचा 5 गड्यांनी पराभव करुन प्रत्येकी 2 गुण मिळवले. शुभम खोत (लायाज), अर्णव कुंदप (बीएससी) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. भुतरामहट्टी येथील महावीर जैन स्कूलच्या मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात बेळगाव स्पोर्ट्स क्लब संघाने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 4 गडी बाद 170 धावा जमविल्या. त्यात अशितोष हिरेमठने 7 चौकारांसह 61, संचित सुतारने 8 चौकारांसह 50, अर्णव कुंदपने 2 चौकारांसह 25 धावा केल्या. निना क्रिकेट अकादमीतर्फे रजत जाधवने 22 धावात 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना निना क्रिकेट अकादमीचा डाव 18 षटकात सर्व गडी बाद 103 धावात आटोपला. बेळगाव स्पोर्ट्स क्लबतर्फे अर्णव कुंदपने 13 धावात 3, सोहम पाटीलने 10 धावात 2 तर सुरेंद्र पाटीलने 14 धावात 2 गडी बाद केले. दुसऱ्या सामन्यात एसकेई संघाने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 3 गडी बाद 146 धावा केल्या. त्यात हर्ष नाशिपुडीने 8 चौकारांसह 44, पार्थ केळुस्करने 4 चौकारांसह 35, आर्याने 3 चौकारांसह 32 धावा केल्या. लायाजतर्फे कांडू पाटील व सिद्धार्थ यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना लायाज क्रिकेट अकादमीने 20.3 षटकात 5 गडी बाद 149 धावा करुन सामना 5 गड्यांनी जिंकला. त्यात शुभम खोतने 1 षटकार व 11 चौकारांसह 71, श्रेया पोटोने 4 चौकारांसह 35 धावा केल्या. एसकेईतर्फे समर्थ कोकणेने 18 धावात 3 तर अरपीतने 21 धावात 2 गडी बाद केले.
Previous Articleजिल्हास्तरीय खुल्या स्केटिंग स्पर्धा उत्साहात
Next Article स्वस्तिक मोरेचे कुस्ती स्पर्धेत यश
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









