डिस्ने प्लस हॉटस्टारवर होणार प्रदर्शित
डिस्ने प्लस हॉटस्टारची ओरिजिनल वेबसीरिज ‘सास, बहु और फ्लेमिंगो’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सीरिजचे दिग्दर्शन होमी अदाजानिया यांनी केले आहे. या सीरिजमध्ये डिंपल कपाडिया, राधिका मदान, अंगिरा धर आणि इशा तलवार हे मुख्य भूमिकेत आहेत. तसेच यात आशीष वर्मा, मदन मित्रा, उदित अरोरा, दीपक डोबरियाल अन् मोनिका डोगरा हे कलाकार दिसून येतील. ही वेबसीरिज 5 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

ही वेबसीरिज ‘सासू-सुन’ यांच्यातील एक नवा ड्रामा सादर करणार आहे. यात एक क्रूर सासू अन् चतूर सून दिसून येणार आहे. अनेक धोकादायक महिला या शोमध्ये महत्त्वाची भूमिका साकारताना दिसून येतील. यात अनेक वेगळय़ा प्रकारच्या भूमिका आहेत. या सीरिजमध्ये कौटुंबिक नाटय़ासह अनेक नव्या गोष्टी दिसतील असा दावा डिंपल कपाडिया यांनी केला आहे. डिंपल कपाडिया अलिकडेच एका चित्रपटात दिसून आल्या होत्या.
होमी अदजानिया यांनी यापूर्वी अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यांच्या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळाले आहे. चाहते आता होमी यांच्या सीरिजची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत.









