बेळगाव ; अनगोळ येथे स्मार्टसिटी अंतर्गत गेल्या अनेक वर्षांपासून काम सुरू आहे. मात्र ते काम पूर्ण होणेच अवघड झाले आहे. अजूनही बऱ्याच ठिकाणी समस्या निर्माण होत आहेत. निकृष्ट कामाचा दर्जा उघडकीस येत आहे. यामुळे अनगोळ परिसरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. अनगोळ मुख्य रस्त्यावर काँक्रिटीकरण झाल्यानंतर रस्त्याच्या बाजुला फुटपाथाचे स्वरुप करण्यात आले. फुटपाथच्या बाजुने गटार निर्माण करण्यात आली. काही ठिकाणी जमिनीतून सिमेंट पाईप घालण्यात आले. त्यामधूनच विद्युत पुरवठा करणाऱ्या वाहिन्या घालण्यात आल्या. काही ठिकाणी काँक्रिटची मोठी झाकणे बसविण्यात आली आहेत. इंदिरानगर, चिदंबरनगर कॉर्नरवर असलेल्या गटारीवरील काँक्रिटचे झाकण कोसळले आहे. त्यामुळे मोठा धोका निर्माण झाला असून त्याकडे मनपाचे दुर्लक्ष झाले आहे.
रात्रीच्या वेळी धोकादायक
काही महिन्यातच हा प्रकार सुरू झाला आहे. त्यामुळे भविष्यात मोठ्या समस्या निर्माण होणार, अशी भीती आता निर्माण झाली आहे. या ख•dयाला लागूनच ऑटोरिक्षा थांबविल्या जातात. त्यामुळे हा ख•ा तसा दिसत नाही. मात्र रिक्षा नसताना तो ख•ा स्पष्ट दिसत आहे. रात्रीच्यावेळी तो धोकादायक असून तातडीने त्यावर झाकण बसवावे, अशी मागणी आता होत आहे.









