उचगाव : उचगाव-कोनेवाडी या संपर्क रस्त्यावरील पुलावर दुतर्फा संरक्षक कठडे नसल्याने सदर पूल धोकादायक बनला आहे. या पुलावरून रोज कोणेवाडी माध्यमिक विभागासाठी उचगावला येणाऱ्या विद्यार्थ्यांची ये-जा असते. त्यांच्यासाठी सदर पूल धोकादायक बनला आहे. यासाठी तातडीने या पुलाच्या दुतर्फा कठडे बांधावेत अशी मागणी करण्यात येत आहे. उचगाव ते कोनेवाडी हा दोन ते अडीच किलोमीटर अंतराच्या संपर्क रस्त्यावरुन अनेक नागरिकांची तसेच विद्यार्थ्यांची रोज ये-जा सुरू असते. सदर पुलाच्या दुतर्फा कठडेच नसल्याने हा पूल म्हणजे मृत्यूचा सापळाच बनला आहे. या पुलाच्या प्रारंभीच वळण असल्याने याचा अंदाज बैलगाडी तसेच दुचाकी, चार चाकी वाहनांना येत नसल्याने अचानक या पुलावरुन नाल्यात पडून मोठ्या घटनाही घडल्या आहेत. संभाव्य धोका ओळखून तातडीने या पुलाच्या दुतर्फा संरक्षण कठडे बांधून शेतकरी, नागरिक व विद्यार्थ्यांना होणारा धोका टाळावा अशी मागणी या भागातील नागरिकांतून करण्यात येत आहे.
Previous Articleसीमा मेळाव्यासाठी खानापुरात जनजागृती
Next Article ‘लैला’च्या गळीत हंगामाबाबत शेतकऱ्यांत संभ्रमावस्था
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









