मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार
खानापूर : बेळगाव येथे होणाऱ्या मेळाव्याबाबत खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने खानापूर शहरात पत्रके वाटून जनजागृती करण्यात आली. अधिवेशनाविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने सोमवारी बेळगाव येथे महामेळावा घेण्यात येणार असून, यासाठी खानापूर तालुका समितीने पाठिंबा जाहीर केला आहे. तालुक्यातून मोठ्या संख्येने समितीचे कार्यकर्ते या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. खानापूर शहरात समितीच्यावतीने रविवारच्या आठवडी बाजारात जनजागृती फेरी काढून पत्रके वाटून जनजागृती करण्यात आली आणि मेळाव्यात सहभागी होण्यासाठी आवाहान करण्यात आले. यावेळी म. ए. समिती अध्यक्ष गोपाळ देसाई, निरंजन देसाई, संजय पाटील, पुंडलिक पाटील, कलाप्पा करंबळकर, जगन्नाथ देसाई, नारायण देसाईसह समितीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. तालुक्यातून मेळाव्याला मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचा निर्धार म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.









