वार्ताहर/ माशेल
सम्राट क्लब माशेलतर्फे आयोजित कलाविष्कार हा कला प्रदर्शन सोहळा काल शनिवारी माशेल येथील देवकीकृष्ण सभागृहात मोठ्या दिमाखात प्रारंभ झाला. आज रविवारी या प्रदर्शन सोहळयाचा समारोप होणार आहे.
सोहळ्याचे उद्घाटन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्यहस्ते करण्यात आले. यावेळी कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे, सम्राट कलब इंटरनॅशनल राज्य 1 चे अध्यक्ष अविन नाईक, जिल्हा पंचायत सदस्य श्रमेश भोसले, तिवरे वरगांव पंचायतीचे सरपंच जयेश नाईक, पंचसदस्य शिल्पा वेरेकर, सम्राट क्लब इंटरनॅशनल राज्य 1 चे माजी अध्यक्ष प्रसाद नाईक उपस्थित होते. यावेळी बोलतान मंत्री श्रीपाद नाईक म्हणाले की सम्राट क्लब राज्य स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करीत आहे. सातत्याने सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर आहे. युवा कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात आलेल्या कलाविष्कार उपक्रमाबद्दल सम्राट क्लब माशेलचे मंत्री नाईक यांनी कौतुक केले. मंत्री गोविंद गावडे यांनी युवा कलाकारांना मार्गदर्शन केले. ज्येष्ठ कलाकार दयानंद भगत, कितीकुमार प्रभू व आनंद शेट नार्वेकर यांचा मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
सम्राटच्या अध्यक्षा अनिता रायकर यांनी स्वागत केले. खजिनदार मंगेश गावकर यांनी कलाविष्कार बद्दल माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. रश्मिता आमोणकर यांनी केले. सर्वेश फुलारी यांनी आभार मानले. सकाळच्या सत्रात व्यंगचित्रकार संकेत लवंदे, कलाशिक्षक अनुज उर्फ रामचंद्र शेट नार्वेकर यांची कला जुगलबंदी झाली. संकेत लवंदे यांनी माशेलच्या सुप्रसिद्ध गायिका किशोरीताई आमोणकर यांचे व्यंगचित्र काढले. अनुज नार्वेकर यांनी जलरंगातून निसर्ग चित्र साकारले. दुपारच्या सत्रात आनंद शेट नार्वेकर यांच्या कागद कात्रण कला, हस्तकलेचे प्रात्यक्षिक झाले. आज 14 रोजी सायं. कला प्रदर्शनाचा समारोप होणार आहे. त्यानंतर सर्वासाठी कला प्रदर्शन खुले राहणार आहे.









