विशेष प्रतिनिधी/ पणजी
राज्यातील हवामानात अचानक मोठे बदल झाले आहे. गेले तीन दिवस पहाटे कडाक्याची थंडी सुऊ झाली असताना शनिवारी अचानक राज्यातील तापमानात बदल झाला आणि पावसाचे ढग जमा झाले. हवामान खात्याने सोमवार, मंगळवार आणि बुधवार या दरम्यान विजांच्या गडगडाटासह गोव्यात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
मान्सूनने माघार घेतल्यानंतर गेले आठ दिवस पावसाचा थांगपत्ता नव्हता. पाऊस संपता संपता राज्यात धुके सुऊ झाले आणि गेले तीन दिवस पहाटे पारा एकदमच खाली उतरला. थंडीला प्रारंभ झाला. राज्यात हिवाळ्dयाचे दिवस सुऊ झाले असे असतानाच शनिवारी सायंकाळी हवामानात बदल झाला आणि हळूहळू पावसाचे ढग गोव्यावर आऊढ झाले.
शनिवारी पारा 20 ते 21 डि.से. एवढे झाले. सायंकाळी 7 वा.पर्यंत कोजागिरी पौर्णिमा चंद्राचे दर्शन झाले व त्यानंतर पावसाच्या ढगांनी आक्रमण केले. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार सोमवार दि. 30 ते बुधवार दि. 1 नोव्हेंबरपर्यंत राज्यात बहुतांश ठिकाणी मध्यम तथा हलक्या स्वऊपाचा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात पावसाचे ढग जमा झाले असून त्याचा परिणाम गोव्याच्या हवामानावर होत आहे.









