बेळगाव : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गणाचारी गल्ली, गवळी गल्ली, केळकर बाग येथील खुल्या जागेमध्ये समुदाय भवनची उभारणी करावी. यासाठी नगरसेवक शंकर पाटील यांनी महापौर शोभा सोमणाचे यांना निवेदन दिले. गणाचारी गल्ली, गवळी गल्ली, केळकर बाग येथे महानगरपालिकेच्या खुल्या जागा आहेत. त्या ठिकाणी कचरा फेकण्यात येतो. याचबराब्sार वाहनेदेखील पार्किंग केली जात आहेत. या खुल्या जागांमध्ये अतिक्रमणही होत आहे. तेंव्हा त्या ठिकाणी समुदाय भवन बांधल्यास त्याचा साऱ्यांनाचा फायदा होवू शकतो, असे या निवेदनात म्हटले आहे. यावेळी उपमहापौर रेश्मा पाटील या उपस्थित होत्या.
Previous Articleसंतिबस्तवाडचे पूल पाण्याखाली जाण्याच्या मार्गावर
Next Article अंगणवाडी शिक्षिकेसाठी प्रथम भाषा कन्नडची अट रद्द करा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









