म्हापसा येथील पत्रकार परिषदेत तुलिओ डिसोझा यांचा आरोप
म्हापसा ; काँग्रेस नेते राहुल गांधी यांना न्यायालयाने 2 वर्षाची शिक्षा सुनावली व लोकसभेचे सदस्यत्व रद्द केले. त्यांनी सध्या देशात सुऊ असलेल्या भ्रष्टाचारावर आवाज उठविला होता. अदानींसोबत असलेल्या संबंधांवऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारला प्रश्न विचाऊन गोत्यात आणले होते. त्याला घाबऊन राहुल गांधीचा आवाज दाबण्यासाठीच केंद्र सरकारने त्यांचे लोकसभेचे सदस्यत्व रद्द केले. अन्यायाविऊद्ध आवाज उठविण्याचा अधिकार संविधानाने आम्हाला दिलेला आहे. सत्तेचा गैरवापर कऊन भाजपकडून विरोधकांचा आवाज दाबला जात आहे असा आरोप कऊन या कृतीचा आम्ही निषेध करीत असल्याचे काँग्रेसचे प्रवक्ते तुलिओ यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे. यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष प्रमोद साळगावकर, वरद म्हार्दोळकर, विरेंद्र शिरोडकर, अतुल नाईक उपस्थित होते. सरकारने लोकशाहीचा खून केलेला आहे. लोकांच्या विऊद्ध सरकार षड्यंत्र चालवित आहे. सरकारने विविध कायदे आणले. शेतकऱ्यांच्या विरोधात कायदे आणले मात्र शेतकऱ्यांच्या मागे सदैव राहुल गांधी राहिले असे तुलिओ डिसोझा म्हणाले.
पणजीत स्मार्ट सिटीच्या नावाखाली भ्रष्टाचार
पणजीत स्मार्ट सिटीच्या नावाखाली भ्रष्टाचार चालला आहे. नवा पूल अटल सेतू भ्रष्टाचाराचे केंद्र झाले आहे. तो पूल पूर्वीच योग्यरित्या का बांधला नाही. याला जबाबदार कोण हे सरकारने लोकांसमोर ठेवावे. मुख्यमंत्र्यांना सरकार चालवता येत नसेल तर त्यांनी पायउतार व्हावे. शपथ विधी सोहळा, आमदार कार्यशाळा आदींसाठी कोट्यावधी ऊपये खर्च केले. बेरोजगारी वाढलेली आहे, विकासकामे राज्यात बंद आहे, त्याच्याकडे लक्ष देणे काळाची गरज आहे, असे तुलिओ डिसोझा म्हणाले.
महिला आयुक्तासाठी घटना तयार करा- प्रमोद साळगावकर
काँग्रेसच्या वरिष्ठ उपाध्यक्षा प्रमोद साळगावकर म्हणाल्या की, राहुल गांधींवर झालेल्या अन्यायाचा गोवा काँग्रेसने निषेध केला आहे. हा प्रश्न आम्ही समाजापर्यंत नेणार आहोत. महिलांचा आम्ही आदर करतो असे सरकार म्हणत असले तरी महिलांच्या संरक्षणात काहीच पाऊले उचलली नाहीत असे प्रमोद साळगावकर म्हणाल्या. आज महिला आयुक्त राज्यात अस्तित्वात नाही. गाडी घेऊन फिरण्यासाठीच हे कमिशन आहे काय? हजारो तक्रारी कमिशनकडे पडलेला आहे. असे साळगावकर यांनी सांगितले.









