आर्मी डिझाइन ब्युरोचा डीएफआयसोबत करार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आर्मी डिझाइन ब्युरोने सोमवारी भारतीय ड्रोन महासंघासोबत (डीएफआय) एका करारावर स्वाक्षरी केली आहे. या कराराच्या अंतर्गत भारतीय सैन्यासाठी उच्चक्षमता असलेले ड्रोन विकसित केले जाणार आहेत.
एस्टेरिया एअरोस्पेस, क्विडिच इनोव्हेशन लॅबस, ऑटोमायक्रो युएएस, आरव अनमॅन्ड सिस्टीम्स आणि इंड्रोन्स या कंपन्या सदस्य असणारा डीएफआय एक उद्योग संघटना आहे. या कराराच्या अंतर्गत डीएफआय आणि एडीबी ‘इंडियन आर्मीज हिम-ड्रोन-ए-थॉन’ नावाचा एक कार्यक्रम सुरू करणार आहेत. भारतीय सैन्याच्या संचालनाला सामर्थ्य देण्यासाठी ड्रोन आधारित तंत्रज्ञानाच्या विकासासाठी प्रस्ताव आमंत्रित पेल जाणार आहेत.
भारतीय उद्योगांना संबंधित क्षेत्रातील आव्हानांची माहिती मिळवून देत त्यानुसार ड्रोन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी एडीबी मार्गदर्शन करणार आहसे. डीएफआय आणि एडीबी मसुदा योजना, संशोधन, परीक्षण, निर्मिती आणि संबंधित तंत्रज्ञानाकरता सहकार्य करणार आहेत.









