गोळीबार आणि महिलेशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप
वृत्तसंस्था/ इंफाळ
मणिपूर पोलिसांनी युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंटच्या (युएनएलएफ) चार दहशतवाद्यांना इंफाळ पश्चिम जिल्ह्यातून अटक केली आहे. या चौघांवरही चिंगमेरोंग येथे कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. गोळीबार, नागरिकांवर हल्ला आणि एका महिलेसोबत असभ्य वर्तन यामध्ये त्यांचा सहभाग होता. पोलिसांनी शनिवारी ककचिंग जिह्यातील तेजपूर आयव्हीआर येथून कांगलीपाक कम्युनिस्ट पक्षाच्या (तैबांगनगांबा) प्रतिबंधित संघटनेच्या सदस्यालाही अटक केली. अटक करण्यात आलेला इसम खंडणीच्या गुन्ह्यात सहभागी असल्याचे त्यात म्हटले आहे.









