वृत्तसंस्था/ पॅरिस
आपल्या मोहिमेला विजयाने सुऊवात केल्यानंतर आज सोमवारी येथे ऑलिम्पिक पुऊष हॉकी स्पर्धेतील आपल्या दुसऱ्या सामन्यात अर्जेंटिनाचा सामना करताना भारताची नजर सातत्यपूर्ण कामगिरी करण्याकडे असेल. शनिवारी झालेल्या तणावपूर्ण सलामीच्या लढतीत भारताने न्यूझीलंडचा 3-2 असा पराभव केल आणि कर्णधार हरमनप्रीत सिंगने शेवटच्या मिनिटांत पेनल्टी स्ट्रोकवर केलेल्या गोलच्या जोरावर विजय मिळवला.
हरमनप्रीतच्या नेतृत्वाखालील संघ सावरण्यापूर्वी सुऊवातीला त्याला 1-0 ने पिछाडीवर टाकलेल्या न्यूझीलंडविऊद्धचा हा सामना सोपा नव्हता. आजचा अर्जेंटिनाविऊद्धचा सामनाही खडतर होण्याची अपेक्षा आहे. कारण दक्षिण अमेरिकी संघ ‘मॅन-टू-मॅन मार्किंग’, ‘हार्ड-टॅकलिंग’ आणि ‘पॉवर गेम’साठी ओळखला जातो. त्याचा सामना भारतीय मधल्या फळीला करावा लागेल. सध्याचे विजेते बेल्जियम, बलाढ्या ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, न्यूझीलंड आणि आयर्लंडसह भारतीयांना कठीण ‘ब’ गटामध्ये ठेवण्यात आले आहे.
न्यूझीलंड, अर्जेंटिना आणि आयर्लंडविऊद्धचे पहिले तीन सामने भारतासाठी जास्तीत जास्त गुण मिळविण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. कारण नंतर बेल्जियम आणि ऑस्ट्रेलियाशी त्यांची गाठ पडणार आहे. आज सोमवारी विजय मिळविल्यास पॅरिस गेम्सच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताचा प्रवेश जवळपास निश्चित होईल. भारताचा गोलकीपर पी. आर. श्रीजेश आपली शेवटची आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळत असून पुन्हा एकदा त्याने आपल्यावरील विश्वास सार्थ ठरविताना शनिवारी नेहमीप्रमाणे गोलसमोर भिंतीसारखे उभे राहून असंख्य प्रयत्न उधळून लावले.
भारत सध्या गट ‘ब’मध्ये बेल्जियमच्या मागे दुसऱ्या स्थानावर आहे. परंतु तिसऱ्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या पुढे आहे. परंतु हे प्रारंभिक टप्पे आहेत आणि अर्जेंटिना व आयर्लंडविऊद्धचे पुढील दोन सामने झाल्यानंतर चित्र स्पष्ट होईल. कर्णधार हरमनप्रीत, अमित रोहिदास आणि सुमित यांना श्रीजेशवरील जबाबदारी कमी करण्याच्या दृष्टीने सर्वोत्कृष्ट कामगिरी करावी लागेल. मनप्रीत आणि उपकर्णधार हार्दिक सिंग यांच्या नेतृत्वाखालील मधली फळी भक्कम दिसते. मनदीपच्या नेतृत्वाखालील आघाडी फळी देखील स्थिर दिसत आहे. परंतु अभिषेक, गुरजंत सिंग आणि सुखजित सिंग यांना गोल करण्याच्या संधी निर्माण करण्यासाठी अधिक सक्रिय व्हावे लागेल.









