इन्सुली खामदेव नाका येथे मध्यरात्री अपघात
मयुर चराटकर
बांदा
मुंबई गोवा महामार्गावरील इन्सुली खामदेव नाका येथे साईडपट्टीचा अंदाज न आल्याने झारापहुन बांदयाच्या दिशेने जाणारा डंपर रस्त्यावर पलटी झाला. या ठिकाणी ओव्हरब्रिजचे काम सुरु असुन ठेकेदाराकडून साईडपट्टीला रेडीयम न लावल्याने ही गाडी पलटी झाल्याचा आरोप उपस्थितांनी केला. या अपघातात सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. हा अपघात रात्री उशिरा झाला. मात्र महामार्ग विभागाने सुरु असलेल्या कामाच्या ठिकाणी लक्ष घालून धोकादायक साईडपट्टीला रेडीयम आणि दिशादर्शक फलक लावण्याची मागणी इन्सुली ग्रामस्थांनी केली आहे. याठिकाणी साईडपट्टीला रेडीयम पट्टे किंवा कोणतीही सुरक्षा नसल्याने अपघात होत आहेत. यामध्ये डंपरचे नुकसान झाले. अपघातानंतर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.









