शिमला
हिमाचल प्रदेशात शिमला राष्ट्रीय महामार्गावर एका भरधाव कारने 9 जणांना चिरडले आहे. या दुर्घटनेत 5 जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. तर उर्वरित 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी 9.20 वाजता धर्मपूरमध्ये ही दुर्घटना घडली आहे. येथील एका इमारतीत काम करणाऱया 9 मजुरांना भरधाव कारने चिरडले होते. ही कार 23 वर्षीय युवक चालवत होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले मजूर हे प्रामुख्याने बिहारचे रहिवासी आहेत.









