अहमदाबाद
गुजरात एटीएस आणि भारतीय तटरक्षक दलाने संयुक्त मोहिमेदरम्यान अरबी समुद्रात एका इराणी नौकेला ताब्यात घेतले आहे. या नौकेतून 5 जण प्रवास करत होते. या नौकेतून 61 किलो वजनाचे अमली पदार्थ हस्तगत करण्यात आले आहेत. या अमली पदार्थांचे मूल्य 425 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. तर याप्रकरणी पुढील चौकशीसाठी नौकेवरील लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे.









