विदेशातून मिळणार अर्थसहाय्य ः जामिया मिल्लिया, आयआयटी दिल्लीचा समावेश
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिल्ली आयआयटी, जामिया मिल्लिया समवेत देशभरातील 6 हजार संस्था अणि संघटनांच्या एफसीआरए नोंदणीची मुदत संपुष्टात आली आहे. विदेशी देगणी (विनियमयन) अधिनियम (एफसीआरए) नेंदणी ही विदेशातून अर्थसहाय्य मिळविण्यासाठी आवश्यक असते. एफसीआरए नोंदणी शनिवारी समाप्त झालेल्या संस्थांमध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) आणि नेहरू स्मारक संग्रहालय तसेच पुस्तकालय सामील असल्याची माहिती अधिकाऱयांनी दिली आहे.
या संस्थांनी स्वतःच्या एफसीआरए परवाना नुतनीकरणासाठी अर्ज केलेला नाही किंवा केंद्रीय गृह मंत्रालयाने त्यांचे अर्ज फेटाळले असावेत. विदेशी देणगी अधिनियमाशी संबंधित अधिकृत वेबसाइटनुसार एफसीआरए अंतर्गत नोंदणी संपुष्टात आलेल्या संस्था आणि संघटनांमध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र, भारतीय लोक प्रशासन संस्थान, लालबहादुर शास्त्राr मेमोरियल फौंडेशन, लेडी श्री राम कॉलेज फॉर वुमन, दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनियरिंग आणि ऑक्सफॅम इंडिया सामील आहे.
हजारो एनजीओंचे कामकाज बंद
एफसीआरए अंतर्गत नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था (एनजीओ) आणि त्यांच्या सहकाऱयांच्या हालचालींना नियंत्रित करणाऱया केंद्रीय गृह मंत्रालयायच अधिकाऱयांनी अधिनियमाच्या अंतर्गत नोंदणी शनिवारी समाप्त झाल्याचे म्हटले आहे. शुक्रवारपर्यंत 22,762 एफसीआरए-नोंदणीकृत एनजीओ होत्या. शनिवारी हा आकडा कमी होत 16,829 वर आला आहे, कारण 5,933 एनजीओंनी कामकाज बंद केल्याचे अधिकाऱयांकडून सांगण्यात आले.
अनेक संस्थांचा समावेश
मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया, इमॅन्युएल हॉस्पिटल असोसिएशन, टय़ूबरकोलोसिस असोसिएशन ऑफ इंडिया, विश्व धर्मायतन, महर्षी आयुर्वेद प्रतिष्ठान, नॅशनल फेडरेशन ऑफ फिशरमेन कॉऑपरेटिव्ह्ज लिमिटेड या संस्थांची नोंदणी समाप्त झाली आहे. हमदर्द एज्युकेशन सोसायटी, दिल्ली स्कुल ऑफ सोशल वर्क सोसायटी, भारतीय संस्कृती परिषद, डीएव्ही कॉलेज ट्रस्ट अँड मॅनेजमेंट सोसायटी, इंडिया इस्लामिक कल्चरल सेंटर, गोदरेज मेमोरियल ट्रस्ठ, दिल्ली पब्लिक स्कुल सोसायटी, जेएनयूमधील न्यूक्लियर सायन्स सेंटर, इंडिया हॅबिटेट सेंटर, अखिल भारतीय मारवाडी युवा मंच या संस्थांचीही नोंदणीची मुदत समाप्त झाली आहे.









