मुंबई : देशातील तिसऱ्या नंबरची मोठी आयटी कंपनी एचसीएल टेक्नॉलॉजीने 30 जूनला संपलेल्या पहिल्या तिमाहीत 3534 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. वर्षाच्या आधारावर पाहता नफ्यातील वाढ 7.6 टक्के इतकी असून तिमाही आधारावर हा नफा 11 टक्के घसरणीसह नोंद झाला आहे. कराराच्या संख्येमध्ये झालेली घट व इतर टेलिकॉमसारख्या सेवांमध्ये दिसलेली घसरण याचा नकारात्मक परिणाम तिमाहीतील नफ्यात दिसून आला. तज्ञांनी मात्र 3782 कोटी रुपयांचा नफा कंपनीला होऊ शकतो असा अंदाज मांडला होता. तो अंदाज फोल ठरला आहे. कंपनीने याच कालावधीत वर्षाच्या आधारावर 12 टक्के वाढीसह 26,296 कोटी रुपयांचा एकत्रित महसूल प्राप्त केला आहे. मागच्या वर्षी समान अवधीत 23,464 कोटी रुपयांचा महसूल कंपनीने प्राप्त केला होता.
Previous Articleस्कोडा कुशाक मॅट आवृत्ती भारतीय बाजारात सादर
Next Article 15 लाखांवरून विधानसभेत गदारोळ
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









