आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी : पुरावे देण्याचे भाजपचे सरकारला आव्हान

बेंगळूर : पंतप्रधान नरेंद्र मांदी यांनी देशातील सर्व नागरिकांच्या बँक खात्यावर 15 लाख रुपये जमा करणार असल्याचे सांगितले होते, या मुद्द्यावरून गुरुवारी विधानसभेत सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी पक्ष भाजप आमदारांमध्ये शाद्बिक चकमक घडली. पंतप्रधानांनी 15 लाख रु. देणार असल्याचे सांगितले असेल तर त्याचे पुरावे द्या. जर हे सत्य असेल तर मी राजकीय निवृत्ती घेईल, असे आव्हान माजी मंत्री बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी दिले. राज्यपालांच्या भाषणावरील आभार प्रस्तावावर चर्चा सुरू असताना काँग्रेसचे आमदार, मंत्री एम. एच. कोनरे•ाr यांनी, काँग्रेस सरकारने पाच गॅरंटी योजना जारी केल्या आहेत. मात्र, पंतप्रधान मोदी यांनी 15 लाख रुपये बँक खात्यावर जमा करणार असल्याचे सांगितले होते. अद्याप हे पैसे खात्यावर आलेले नाहीत, असा टोला भाजपच्या आमदारांना लगावला. त्यामुळे भाजप आमदार संतप्त झाले. पंतप्रधानांनी 15 लाख रु. देणार असल्याचे सांगितलेल्या भाषणाची चित्रफित असेल तर द्या. पंतप्रधानांनी पैसे जमा करणार असल्याचे सांगितलेले असेल तर ते सिद्ध करा, मी राजकीय निवृत्ती घेईल. बेजबाबदारपणे वक्तव्ये करू नका. पुरावे समोर ठेवून बोला, असे आव्हान यत्नाळ यांनी दिले. दरम्यान, भाजपचे सर्व आमदार यत्नाळ यांच्या समर्थनार्थ उभे राहून पुरावे असल्याशिवाय बोलू नका, पुरावे द्या, अशी जोरदार मागणी केली. यावेळी भाजप आणि काँग्रेस आमदारांमध्ये शाद्बिक चकमक घडली. त्यामुळे विधानसभेत गदारोळ माजला. या गदारोळादरम्यान बोलताना मंत्री के. एन. राजण्णा यांनी, पंतप्रधानांनी अशा प्रकारे सांगितलेले केवळ देशालाच नव्हे; तर संपूर्ण जगाला माहित आहे. तुमची ही भूमिका योग्य नाही, असा टोला भाजप आमदारांना लगावला. तुम्ही आक्रमक भूमिका घेतली म्हणजे तुम्हाला विरोधी पक्षनेता बनवतील, असा समज आहे का?, मात्र ते शक्य नाही, अशी खोचक टिप्पणीही राजण्णा यांनी यत्नाळ यांना उद्देशून केली.
पुरावे असल्याशिवाय बोलू नका : यत्नाळ

मंत्री राजण्णा यांच्या टिप्पणीमुळे भाजपचे आमदार पुन्हा संतप्त झाले. पुरावे असल्याशिवाय बोलू नका. पंतप्रधानांनी अशा पद्धतीचे वक्तव्य कोठेही केलेले नाही. तुम्ही पुरावे दिल्यास मी पंतप्रधानांनाच याविषयी विचारेन. आमच्याकडे इतकी लोकशाही आहे. माझ्याकडेही क्षमता आहे, असे प्रत्युत्तर यत्नाळ यांनी दिले. दरम्यान, काँग्रेसचे आमदार प्रसाद अब्बय्या यांनी भाजप आमदारांना खडसावले. राज्यात भाजपची सत्ता असताना तुम्हाला केंद्राकडे जीएसटीचा वाटा मागण्याची हिंमत झाली नाही. आता पंतप्रधानांकडे याविषयी विचारणा करणे जमेल का?, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी भाजपचे आमदार बी. वाय. विजयेंद्र म्हणाले, पंतप्रधानांविषयी काँग्रेस आमदार निराधार वक्तव्ये करत आहे. त्यामुळे कामकाजाच्या फाईलीमधून हे वक्तव्य काढून टाका, अशी विनंती सभाध्यक्षांकडे केली. त्यावेळी पुन्हा एकदा कोनरे•ाr बोलण्यासाठी उभे राहिले. मी सत्य सांगत असल्याचा दावा त्यांनी केला. तेव्हा भाजपच्या आमदारांनी आक्षेप घेतला. भाजप आमदार यशपाल सुवर्ण बोलण्यासाठी उभे राहताच कोनरे•ाr यांनी तुम्हाला पाहून मला बोलण्याची गरज नाही. मी देखील आंदोलने करून सभागृहात आलेलो आहे, असे सांगितले. तेव्हा भाजपचे चन्नबसप्पा यांनी पंतप्रधानांनी विदेशातील काळा पैसा देशात आणणार असल्याचे सांगितले होते. 15 लाख रुपये लोकांच्या खात्यावर जमा करेन, असे सांगितले नव्हते, असे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला.
विदेशातून काळा पैसा आणला का? : जॉर्ज
त्यावेळी मंत्री के. जे. जॉर्ज यांनी काळा पैसा आणला का?, 9 वर्षात किती काळा पैसा देशात आणला, असे प्रश्न उपस्थित केले. सभागृहात विषयांतर होत असल्याचे जाणून सभाध्यक्ष यु. टी. खादर यांनी, कोनरे•ाRना माझ्याकडे बघून बोला, संपूर्ण गावाकडे पाहून बोलू नका, असे सूचित केले. त्यानंतर वादावादीवर पडदा पडला.









