वृत्तसंस्था/ सिडनी
2024 साली होणाऱया आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद अमेरिकेला बहाल होण्याची शक्यता असून असे झाल्यास अमेरिकेत प्रथमच आयसीसी विश्वचषक भरवला जाणार आहे.
2028 साली होणाऱया लॉस एंजिल्स ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याचा प्रयत्न सुरू असल्याने आयसीसीकडून 2024 च्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद अमेरिकेला दिले जाईल, अशी चर्चा आहे. या संदर्भात येथील एका वृत्तपत्रामध्ये ही बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
2024 टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी आयसीसीकडून अमेरिका क्रिकेट आणि क्रिकेट विंडीज यांना संयुक्त यजमानपद देण्याचा विचार आहे. 2028 ऑलिम्पिक लॉस एंजिल्स येथे होणार आहे. अमेरिकेला या स्पर्धेपूर्वी टी-20 विश्वचषक 2024 स्पर्धेचे यजमानपद बहाल केले तर ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होणे अधिक सोपे जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 2036 ऑलिम्पिक यजमानपद शर्यतीमध्ये भारताचा समावेश असल्याचे भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या प्रवक्त्याने सांगितले.









