वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
देशात वीज मागणी चालू आर्थिक वर्षात 6 टक्क्मयांनी कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कोविड 19 च्या वाढत्या संसर्गामुळे देशामधील विविध भागांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा केली जात आहे. यामुळे आर्थिक उलाढाली करणारी क्षेत्रे प्रभावीत झाली असल्याची माहिती रेटिंग एजन्सी इक्राने नुकतीच दिली आहे.
इक्राच्या माहितीनुसार अखिल भारतीय पातळीवर वीज मागणी आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये 1,291 अब्ज युनिटवर राहिली होती. ज्यामध्ये याअगोदरच एप्रिलमध्ये वीज मागणी चालू आर्थिक वर्षात एक टक्क्मयांनी कमी राहणार असल्याचा अंदाज बांधला होता. परंतु देशातील विविध ठिकाणी कोविडला रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा होत असल्याने वीज मागणी 2020-21 मध्ये मात्र पूर्वीच्या आर्थिक वर्षापेक्षा 5 ते 6 टक्क्मयांनी कमी राहण्याची शक्मयता व्यक्त केली जात आहे.
चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीमध्ये अखिल भारतीय स्तरावर वीज मागणी वर्षाच्या आधारावर 16.2 टक्क्मयांनी कमी राहिली आहे. परंतु ही घसरण दुसऱया आणि तिसऱया तिमाहीमध्ये 3.5 ते 4 टक्क्मयांपर्यंत राहण्याची माहिती आहे. चौथ्या तिमाहीच्या जवळपास एक टक्क्मयांनी हलकी वाढ होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.









