वार्ताहर /येडूर :
कोरोना महामारीला परतवून लावण्यासाठी नागरिकांनी जागरुक रहावे, असे आवाहन येडूर ग्रा. पं. चे प्रशासक एस. पी. वल्यापूरकर यांनी केले. कोव्हीड-19 च्या पार्श्वभूमीवर ग्रा. पं. कार्यालयात आयोजीत दक्षता समितीच्या अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. पीडीओ प्रकाश समाजन्नावर यांची प्रमुख उपस्थिती होती.
वल्यापूरकर म्हणाले, चिकोडी तालुक्यात कोरोना रुग्णांचा फैलाव वाढत आहे. अंकली, मांजरी, मांजरीवाडी, शिरगुप्पी, कल्लोळ, चंदूर, एकसंबा आदी गावांमध्ये कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. येडूर येथील प्राथमिक वैद्याधिकाऱयांनी राजीनामा दिल्याने येथे नव्या वैद्याधिकाऱयाची नेमणूक करण्याची मागणी जिल्हा आरोग्य प्रशासनाकडे केली असून, ग्रा. पं. कार्यक्षेत्रात 5 जणांना क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.









