कोल्हापूर / अहिल्या परकाळे :
शिवाजी विद्यापीठ अंतर्गत शिकवल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यानुसार विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांमध्येही वाढ होत असल्याने त्यांना प्राथमिक सोयी–सुविधा मिळवून देणे विद्यापीठ प्रशासनाची गरज आहे. त्यामुळे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या कालावधीत त्यांनी 15 सुसज्ज इमारती उभारल्या आहेत. गेल्या 60 वर्षापासून सुरू असलेल्या अभ्यासक्रमांना स्वतंत्र इमारती मिळाल्या आहेत. त्यामुळे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांच्यानंतर कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या कुशल नेतृत्वामुळेच 60 कोटी रूपये खर्च करून या इमारती उभारल्या आहेत. यातून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी लागणाऱ्या सुविधा उपलब्ध करून दिल्याने विद्यार्थीनींच्या संख्येत वाढ होत आहे.
विद्यापीठाची दिवसेंदिवस शैक्षणिक प्रगती होत असून नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमांची संख्या वाढत आहे. त्यानुसार या अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा आकडादेखील वाढल्याने प्राथमिक सोयी–सुविधा देणे गरजेचे आहे. तसेच जवळपास 20 पेक्षा जास्त अध्यासन, एक स्टार्टअप, 10 पेक्षा जास्त वसतिगृह बांधण्यात आली आहेत. शासनासह स्वनिधी आणि लोकस्मृती वर्गणीतूनही वसतिगृह, वाचनालयाची उभारणी केली जात आहे. राहण्याची व भोजनाची सोय होत असल्याने विद्यार्थीनींची संख्या वाढली असून अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर एम. फिल., पीएच. डी. करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होवू लागली आहे. त्यामुळे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी आपल्या संकल्पनेतून लोकस्मृती वसतिगृह उभारण्यास प्रारंभ केला आहे. याला दानशूर व्यक्तींचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. एवढेच नाही तर शासनाकडून जास्तीत जास्त निधी मिळवण्याचा कुलगुरू डॉ. शिर्के प्रयत्न करीत आहेत. तसेच विद्यापीठ फंडातील करोडो रूपयांचा निधी इमारतींसाठी खर्च केला जातोय. परिणामी विद्यापीठातील जागाही गुंतुन राहिली अन् प्रत्येक विषयाला स्वतंत्र इमारत मिळाली आहे. परिणामी शिक्षणासह विद्यार्थी संशोधनही इथेच करू शकतात, आपण केलेल्या संशोधनाचे स्टार्टअपच्या माध्यमातून व्यवसाय सुरू करण्यासही विद्यापीठ प्रशासन विद्यार्थ्यांना सर्वोत्परी मदत करत आहे.
- अनेक अभ्यासक्रमांना मिळाल्या स्वतंत्र इमारती
गेल्या साठ वर्षापुर्वी सुरू असलेल्या अनेक अभ्यासक्रमांना स्वतंत्र इमारती नव्हत्या. विद्यापीठांचे खेळाडू, कलाकार आणि परदेशी विद्यार्थ्यांना विद्यापीठात राहण्याची सोय नव्हती. ही अडचण लक्षात घेवून वसतिगृह भारली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची सोय झालीच पण अभ्यासक्रमांनाही स्वतंत्र इमारती मिळाल्याने प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
- शैक्षणिक, प्रशासकीय कामाला वेग
कुलगुरू डी. टी. शिर्के गेल्या चाळीस वर्षापासून विद्यापीठात कार्यरत असल्याने त्यांनी विविध अधिकार मंडळावर काम केले आहे. ज्या विद्यापीठात विद्यार्थी त्याच विद्यापीठात प्राध्यापक आणि विविध अधिकार मंडळ, प्र–कुलगुरूसह कुलगुरू म्हणून रूजू झाले. त्यामुळे विद्यापीठातील प्रत्येक प्रश्नाची त्यांना जाण असून त्यावर उपाययोजना काय करायच्या याची माहिती आहे. त्यामुळे कुलगुरू झाल्यानंतर त्यांनी नियमांच्या अधिन राहून शैक्षणिकसह प्रशासकीय कामाला वेग आला आहे. त्यांनी आपल्या अधिकाराखाली विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला असून उत्तम प्रशासक म्हणून त्यांची ओळख आहे.
- इमारती व रक्कम
– प्राणीशास्त्र विभागांतर्गत सेंटर ऑफ एक्सलन्स अॅन्ड इनक्युबेशन सेलिकल्चर इमारत : 81 लाख 18 हजार
– सायबर सिक्युरिटी विभागाच्या इमारतीचे विस्तारीकरण : 1 कोटी 87 लाख 76 हजार
– अस्मिता–संशोधन विद्यार्थीनी वसतिगृह : 68 लाख 95 हजार
– कुस्ती संकुल : 1 कोटी 51 लाख 98 हजार
– डॉ. अॅड कै. रूपाली पणदूरकर अभ्यासिका : 58 लाख 8 हजार
–पुर्व व पश्चिम भागास कायमस्वरूपी जोडण्याकीरता भुयारी मार्ग: 8 कोटी 48 हजार 82
–यशवंतराव चव्हाण स्कुल ऑफ रूरल डेव्हलपमेंटची इमारत : 1 कोटी
–वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागासाठी इमारत : 6 कोटी 38 लाख 58 हजार
–क्रीडा विभागाचे वसतिगृह : 5 कोटी 37 लाख 27 हजार
–विद्यार्थी कल्याण विभागासाठी वसतिगृह : 3 कोटी 53 लाख 13 हजार
– होलिस्टीक डेव्हलपमेंट ऑफ स्टुडंट अॅण्ड डिजिटल स्टुडीओ, डाटा सेंटर आणि डिजास्टर रिकव्हरी केंद्र : 7 कोटी 47 लाख
–लोकस्मृती वसतिगृह : 1 कोटी 83 लाख 30 हजार
–भूगोलशास्त्र विभागाचे विस्तारीकरण : 1 कोटी 38 लाख 96 हजार
–संख्याशास्त्र अधिविभागासाठी सेमिनार हॉल : 1 कोटी 52 लाख 46 हजार
- नाविन्यपूर्ण गोष्टी केल्याचा आनंद
कुलगुरू पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर ज्या विभागांसाठी स्वतंत्र इमारत व सुविधा नाही. अशा विभागांना इमारत व सुविधा उपलब्ध करून दिल्या. कुलगुरू असल्याने काही नाविन्यपूण गोष्टी करता आल्या, यातून विद्यार्थ्यांना न्याय मिळाला याचा आनंद आहे.
डॉ. डी. टी. शिर्के (कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ)








