बेळगाव : काल सोमवार दि 7 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता झालेल्या वादळी पावसामुळे भोज गल्ली , शहापूर , बेळगाव येथील राघवेंद्र मंजुनाथ शेठ यांच्या घरामागील फणसाचे झाड घरावर कोसळले आहे. यामुळे घराचे छप्पर आणि भिंतीचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. यामुळे आता या घरात राहणे धोकादायक बनले असून, उर्वरित घर कधी कोसळेल याची शाश्वती नाही. त्यामुळे शासनाने तातडीने झालेल्या या घटनेची माहिती घेऊन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेठ कुटुंबियांकडून व्यक्त केली जात आहे.










