विक्रांत मैसी आणि क्रीति खरबंदा यांचा आगामी चित्रपट ‘14 फेरे’चा ट्रेलर अलिकडेच प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या चित्रपटात प्रसिद्ध मॉडेल गौहर खानही महत्त्वाच्या भूमिकेत दिसून येईल. गौहर दोन वेगवेगळय़ा भूमिका पार पाडत आहे. एक व्यक्तिरेखा नाटय़कलाकाराची तर दुसऱया व्यक्तिरेखेत ती 60 वर्षांची वृद्धा म्हणून दिसून येईल. या व्यक्तिरेखा आव्हानात्मक होत्या असे गौहर सांगते.

आव्हानात्मक भूमिका पार पाडण्याची संधी मिळणे कलाकारासाठी गरजेचे आहे. मी सुमारे 30 वर्षांची असून देखील 60 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या स्त्राrची भूमिका मी साकारली आहे. चित्रपटातील एक व्यक्तिरेखा राजस्थानी जाट तर दुसरी बिहारी असल्याने त्या योग्यप्रकारे साकारणे माझ्यासाठी आव्हानच होते. मी स्वतःचे सर्वोत्तम योगदान दिले आहे. प्रेक्षक माझ्या भूमिकांना पसंत करतील अशी अपेक्षा असल्याचे गौहरने म्हटले आहे. 14 फेरे चित्रपट 23 जुलै रोजी झी5 वर प्रदर्शित होणार आहे. मनोज कलवानी यांच्या या चित्रपटात विक्रांत मैसी, क्रीति खरबंदा यांच्यासह गौहर खान, जमीन खान, सुमित सूरी, प्रियांशू सिंग हे कलाकार देखील झळकणार आहेत









