नवी दिल्ली
दुचाकी निर्मिती कंपनी हिरो मोटोकॉर्प खास युवकांसाठी वेगळय़ा लुकची इलेक्ट्रीक स्कुटर आणणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यासाठी कंपनीने गोगोरोशी करार केला असल्याचे समजते. जर का आपण येणाऱया काळात इलेक्ट्रीक स्कुटर खरेदी करण्याच्या विचारात असाल तर जरा थांबा. भारतात लवकरच नव्या आणि वेगळय़ा अंदाजातील इ-स्कुटर दाखल केली जाणार आहे. तैवानमधील इलेक्ट्रीक वाहन बनवणारी कंपनी गोगोरा यांनी अलीकडेच नव्या दुचाकीसाठी हिरो मोटोकॉर्पशी करार केला आहे. स्कुटर कधी बाजारात दाखल केली जाईल याबाबत स्पष्टता मात्र कंपनीने दिलेली नाही.









