प्रतिनिधी/ रत्नागिरी
शुक्रवारी जिह्यामध्ये 450 कोरोनाबाधित रूग्ण आढळून आल़े जिल्हा शासकीय रूग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी करण्यात आलेल्या 2 हजार 80 चाचण्यांमध्ये आरटीपीसीआर टेस्टमध्ये 283 तर ऍन्टीजेन टेस्टमध्ये 167 असे 450 कोरोनाबाधित रूग्ण आढळून आल़े
रत्नागिरी जिह्याचा विचार करता 15 एप्रिलपासून जिह्यामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले होत़े मात्र सातत्याने रूग्णसंख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आह़े एक महिना उलटूनही रत्नागिरी जिह्यात रूग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आह़े तर मृत्यूंच्या संख्येतही वाढ होत आह़े रूग्णांमध्ये होणारी वाढ लक्षात घेता आरोग्य यंत्रणा अद्ययावत करण्यात येत आह़े तसेच ऑक्सिजनचीही व्यवस्था जिह्यात करण्यात आली आह़े









