जगातील अनेक रहस्यांची उकल वैज्ञानिकांनी केली आहे, परंतु अद्याप काही रहस्यं कायम आहेत. जगात अनेक रहस्यमय जंगल, पर्वत, नदी आणि बेटं असून त्यासंबंधी फारसे काही समोर येऊ शकलेले नाही. आता याचदरम्यान सोशल मीडियावर एक असेच रहस्यमय छायाचित्र व्हायरल होत आहे. अनेक लोकांनी इंटरनेटवर ‘रक्ताची नदी’चे छायाचित्र शेअर केले आहे. अमेरिकेच्या सोन्याच्या खाणींमधून रक्ताची नदी वाहत असल्याचे म्हटले गेले आहे. काही लोकांनी रेडिटवर अमेरिकेच्या दक्षिण डकोटामध्ये लाल रंगाचे पाणी असणाऱया नदीचा शोध लावल आहे. गुगल मॅप्सच्या अनेक स्क्रीनशॉट्समध्ये लाल रंगाची नदी दिसून आली आहे.

या भागात सोन्याचा भांडार असल्याचे म्हणणाऱया युजरच्या दाव्यानंतर लाल रंगाची नदी पाहून लोक अवाप् झाले आहेत. काही स्थानिक लोकांनी या भागात लाल रंगाची नदी असल्याची पुष्टी दिली आहे. परंतु सत्य याच्या एकदम उलट आहे. प्रत्यक्षात या नदीपात्रानजीक अनेक कारखाने असून तेथून धोकादायक रसायने बाहेर पडून नदीत मिसळतात. दूर अंतरावरून पाहिल्यास ही नदी लाल रंगाची दिसून येते. या भागात सोने, वाळू, दगडाचा भांडार आहे. हा भाग एकेकाही सोन्याच्या खाणींसाठी ओळखला जात होता. परंतु 2001 मध्ये या खाणी बंद करण्यात आल्या होत्या.









