बसव भीम सेनेच्यावतीने जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी/ बेळगाव
सुवर्णसौधला निळा रंग द्यावा, याचबरोबर सुवर्णसौध परिसरात सर्व राष्ट्रीय पुरुषांचे पुतळे उभे करावेत, अशी मागणी बसव भीम सेनेच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाची घटना लिहिली आहे. त्या घटनेवरच देश आधारित आहे. आकाशाप्रमाणेच धरतीवरही निळा रंग राहणे गरजेचे आहे. कारण निळय़ा रंगामध्ये कोणत्याही प्रकारचा गर्व नसतो. हा रंग सर्वांना समानतेची वागणूक देतो. त्यासाठी निळय़ा रंगाला अत्यंत महत्त्व आहे.
तेव्हा सुवर्णसौध तसेच सर्व विधानसौध यांना निळा रंगच द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. राष्ट्रीय पुरुषांचे पुतळे बसविण्यास नकार देण्यात आला आहे. मात्र, नकार देणे योग्य नाही. तेव्हा सर्व राष्ट्रीय पुरुषांचे पुतळे उभे करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मल्लेश चौगुले, आनंद कोलकार, एम. आर. कलपत्री, के. डी. मंत्रेशी, जी. आर. कुरणे, शिवपुत्र मेत्री, अर्जुन देमट्टी, सुधीर चौगुले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते..









