ऊस पुरवठा वाहतूकदारांवर अन्याय
खानापूर / वार्ताहर
गोवा संजीवनी साखर कारखाना बंद पडल्यानंतर 2019-20 मधील गोव्यात असलेल्या ऊस उत्पादनाची खानापूर येथील लैला शुगर्स कारखान्याला वाहतूक केलेल्या जवळपास 30 हून अधिक वाहतूकदार ट्रक मालकांचे पंधरा लाखाहून अधिक रुपयांचे वाहतूक बिल देण्यास दिरंगाई झाल्याने वाहतूकदार ट्रक मालकांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या दोन्ही साखर कारखान्यात करार केलेल्या जी. एस. ट्रान्सपोर्ट गोवा येथील मालक प्रितम हरमलकर यांचे सदर वाहतूक घरांचे बिल देण्यास अपेक्षित प्रयत्न होत नसल्याने खानापूर तालुक्मयातील सदर वाहतूकदारांच्या समोर अडचण निर्माण झाली आहे. याकरिता खानापूर लैला शुगर्स तसेच गोवा संजीवनी साखर कारखान्याच्या संबंधित व्यवस्थापकांनी यासंदर्भात त्वरित दखल घेऊन वाहतूकदारांचे दहा दिवसांत बिल अदा करावे, अन्यथा 13 जानेवारी रोजी खानापूर येथे गोव्याला जाणारा रस्ता बंद करून आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा खानापूर तालुक्मयातील ऊस वाहतूकदार ट्रक मालकांनी एका निवेदनाद्वारे केला आहे. याबाबतचे निवेदन सोमवारी खानापूर तहसीलदाराना सदर ट्रक मालकांनी दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, 2019-20 या गळीत हंगामात लैला शुगर्स कारखान्याच्या मार्ग सूचनेनुसार गोवा येथील संजीवनी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱया सर्व ऊस वाहतुकीसाठी तालुक्मयातील जवळपास तीस ट्रक मालकांना जीएस ट्रान्सपोर्ट गोव्याचे मालक प्रितम हरमलकर यांच्या मध्यस्थीनुसार वाहतूक करार करण्यात आला. या करारानुसार सदर ट्रक मालकांनी जवळपास 30 ते 40 हजार टन गोव्यातून उसाची खानापूरला वाहतूक केली आहे. सदर वाहतुकीचे अंदाजे 15 लाख रुपये वाहतूक बिल झाले. मात्र आता वाहतूक बिले देण्यास टाळाटाळ केली जात आहे. वाहतूकदारांनी संबंधित ठेकेदार व लैला शुगर्स कारखान्याच्या व्यवस्थापकांची संपर्क साधला असता यासंदर्भात आम्हाला न्याय मिळाला नाही. कोरोना महामारी परिस्थितीत तसेच महापुराच्या परिस्थितीनंतर खानापूर तालुक्मयातील सदर ट्रकमालक घरची परिस्थिती हलाखीची झाली आहे. त्यातच बिले देण्यास दुर्लक्ष झाल्याने आम्हाला ट्रक मालकांच्यांवर अन्याय झाला आहे. मागील बिल थकीत असतानाही यावषी पुन्हा गोव्यातून उसाची वाहतूक केली जात आहे. पण आमच्या मागील थकीत बिलासंदर्भात कोणतीच पावले उचलली गेली नाहीत. यासाठी संबंधित लैला शुगर्स कारखान्याच्या व्यवस्थापकांनी ठेकेदाराची संपर्क साधून येत्या दहा दिवसाच्या आत आमची बिले सादर करावीत अन्यथा 13 जानेवारी रोजी सकाळी 10 पासून गोव्याहून खानापूरला येणारी ऊस वाहतूक बंद करून आंदोलन केले जाईल, असा इशारा करण्यात आला आहे.
सदर निवेदन देताना ट्रक मालक अमृत शेलार, संतोष देसाई, प्रकाश चव्हाण, रामचंद्र देसाई, धनंजय हेब्बाळकर, मोहन गावडे, विलास देसाई, नागेश देसाई&&, आदाव लोगो, मुस्ताक मनोळी, शशिकांत जरली, महेश पाटील यासह अनेक ट्रक मालक उपस्थित होते.









