वृत्तसंस्था/ मुंबई
सीएनजी इंधनावरील वाहनांना लाँचिंग करण्याचा सपाटा अलीकडे अनेक कंपन्यांनी लावला असून यात आता टाटाची भर पडणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार टाटा मोटर्स आपल्या दोन वाहनांना सीएनजी इंधनावरील सादर करण्याच्या बेतात आहे.
टाटा मोटर्स पुढील महिन्यात आपल्या टीयागो, टीगोर या चारचाकी गाडय़ा सीएनजी आधारीत बाजारात दाखल करणार असल्याचे सांगितले जात आहे. या गाडय़ा याआधी नोव्हेंबरमध्ये दाखल करण्याचा विचार होता. पण आता जानेवारी 2022 मध्ये सदरच्या गाडय़ा लाँच केल्या जाऊ शकतात. काही ठराविक विक्रेत्यांनी या गाडीचे बुकिंग घेण्यास सुरूवात केली असल्याचे समजते. सदरच्या गाडीचे बुकिंग अधिकृतरित्या सुरू झालेले नाही, असेही सांगितले जाते. पण 2022 मध्ये लाँचिंगवेळी बुकिंग सुरू होणार असून 1000 ते 15 हजार रुपये आगाऊ भरून गाडी बुक करता येण्याची सोय ग्राहकांसाठी असणार आहे.









