आलिशान फ्लॅटसारख्या सुविधा उपलब्ध
लिव्ह आणि लेविस नावाच्या जोडप्याने स्वतःच्या फ्लॅटमधील जीवन सोडून एका व्हॅनलाच स्वतःचे घर केले ओह. हे जोडपे हिंडण्या-फिरण्याचे शौकीन आहे. परंतु कोरोना महामारी आणि हॉटेल्सवर होणारा खर्च पाहता त्यांनी स्वतःच्या कॅम्परव्हॅनला एका छोटय़ा फ्लॅटमध्ये रुपांतरित केले. जोडप्याने या व्हॅनच्या आत स्व्तःच्या गरजेच्या सर्व गोष्टी ठेवल्या आहेत.
लिव्ह आणि लेविस यांनी स्वतःचे घर आणि नोकरी सोडून एका मर्सिडीज स्प्रिंटर व्हॅनला स्वतःच्या घरात रुपांतरित केले. 11 लाखाची त्यांची व्हॅन ट्रान्सफॉर्मेशननंतर आता 45 लाख रुपयांची कॅम्परव्हॅन झाली आहे. यात टॉयलेट, टीव्ही आणि शॉवर यासारख्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत.

29 वर्षीय या जोडप्याने ही सर्व कामे स्वतःच केली आहेत. फिटिंग, पाणी अन् वीजजोडणीचे काम देखील त्यांनीच पार पाडले आहे. याकरता लेविस यांनी स्वतःच्या आजोबांची मदत घेतली. या व्हॅनला घर करण्यासाठी त्यांना एकूण 3 महिन्यांचा कालावधी लागला.
2019 मध्ये या जोडप्याने लंडनमधील स्वतःचे घर आणि नोकरी सोडून आशियात प्रवास करण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान त्यांना व्हॅनची गरज भासली. कोरोना महामारीमुळे ते प्रवासात अडकून पडल्याने त्यांनी फेब्रुवारी 2021 मध्ये 11 लाखांची एक व्हॅन खरेदी करत त्याला मोबाइल हाउसमध्ये रुपांतरित करण्यास सुरुवात केली.
वीजेसाठी त्यांनी व्हॅनच्या छतावर सौरघट बसविले असून त्याद्वारे बॅटरी चार्ज करून वीजेचा वापर केला जातो. व्हॅनच्या आत कुशन आणि लाकूड काम त्यांनी इंटरनेटवर शिकून केले. स्वस्त सामग्रीचा वापर करत त्यांनी व्हॅनचे रुपडं पालटले आहे. या जोडप्याला सर्वात अधिक त्रास गोलाकार व्हॅनमध्ये फिटिंग्स बसविण्यात झाला. घरातील बहुतांश गोष्टी गोल्डन फिनिशच्या आहेत.









